रवंजे बु. येथील सराईत गुन्हेगारावर एरंडोल पोलिसांकडून स्थानबद्धतेची कारवाई, येरवडा कारागृहात रवानगी..!

0

एरंडोल, लोकशाही न्युज नेटवर्क

तालुक्यातील रवंजे बु! येथील सराईत गुन्हेगार नाना उत्तम कोळी याच्यावर एम.पी.डी.ए अंतर्गत एरंडोल पोलिसांकडून स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. व नाना उर्फ बुधा कोळी याची येरवडा येथील कारागृहात रवानगी करण्यात आली.

एरंडोल तालुक्यातील रवंजे बु! येथील सराईत गुन्हेगार नाना उर्फ बुधा उत्तम कोळी याच्यावर एरंडोल पोलिस ठाण्यासह इतर ठिकाणी वेगवगळ्या स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल होते. त्याच्यावर अनेकदा प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील त्याच्या वर्तणुकीत कोणतीही सुधारणा होत नसल्यामुळे एरंडोल पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांनी त्याच्या बाबत महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, तसेच औषधीद्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्तींच्या विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठीच्या कायद्यान्वये कारवाई चा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सादर केला असता नमूद प्रस्तावास क्र.दंड प्र./का.वी./एम.पी.डी.ए./८२/२३ अन्वये २४ नोव्हेंबर २०२३ रोजी मंजूरी देऊन एका वर्षासाठी स्थानबद्धतेचे आदेश दिल्याने एरंडोल पोलिसांनी नाना उर्फ बुधा कोळी यास रवंजे बु! येथून त्याच्या घरातून ताब्यात घेऊन २५ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री आठ वाजता येरवडा(पुणे) येथे एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले.

ही कारवाई एरंडोल पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक सतीश गोराडे, सहायक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, हेड कॉन्स्टेबल राजेश पाटील, कॉन्स्टेबल पंकज पाटील व अकील मुजावर यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.