नशिराबाद येथे गुटखा विक्री करणाऱ्या दुकानावर कारवाई

0

जळगाव : गुटखा व पान मसाला विक्री करणाऱ्या तालुक्यातील नशिराबाद येथील सुरत पानवाला शॉप दुकानावर अन्न व सुरक्षा औषध प्रशासनाने शुक्रवारी सायंकाळी कारवाई केली. याठिकाणाहून ६ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस शेशनला एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील नशिराबाद येथील बसस्थानकावर असलेल्या सुरत पानवाला शॉप दुकानावर अवैधरित्या गुटखा व पान मसाल्याची विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त शरद मधुकर पवार यांच्यासह त्यांच्या पथकाने शुक्रवारी २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता नशिराबाद येथील सुरत पानवाला शब्द दुकानावर छापा टाकला.

दुकानदाराकडून ६ हजार ६०० रुपये किमतीचा सुगंधित पान मसाला व गुटखा आढळून आला. हा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यानुसार सहाय्यक आयुक्त शरद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुकानदार सय्यद खलील सय्यद अमीर (वय ४०) रा. नशिराबाद, ता. जळगाव याच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.