किरीट सोमय्या यांच्या फलकास जोडे मारत उबाठा सेनेतर्फे तीव्र निषेध

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

भारतीय जनता पक्षाचे खा. किरीट सोमय्या यांचे अश्लिल व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने त्यांच्या या अनैसर्गिक कृत्याचा पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उबाठा सेनेतर्फे तीव्र निषेध नोंदवत किरीट सोमय्या यांच्या फलकास जोडे मारत तसेच, फलक फुंकत जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी उबाठा सेनेच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी, जिल्हाप्रमुख दिपकसिंग राजपूत, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख रमेश बाफना, तालुका प्रमुख शरद पाटील, शहर प्रमुख अनिल सावंत, अॅड. दिपक पाटील, शहर संघटक राजेंद्र राणा, महिला आघाडीच्या मंदाकिनी पारोचे, कुंदन पंड्या, जयश्री येवले, अनिता पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख संदिप जैन, भरत खंडेलवाल, विजय पाटील, खंडु सोनवणे, अजय पाटील यांचेसह मोठ्या संख्येने उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपाचे नराधम खा. किरीट सोमय्या याचे आक्षेपार्ह लैगिंक पिसाटाचे व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झालेला आहे. ही बाब अतिशय संतापजनक असुन महाराष्ट्राच्या अस्मीतेला काळीमा फासणारी आहे. ही बाब सर्वांची शर्मेने मान खाली घ्यायला लावणारी आहे. देशाची संस्कृती “परस्त्री माते समान” हा आदर्श जोपासणारी असुन त्याचा आदर्श आम्हाला प्रभु श्रीरामांच्या चरित्रामध्ये पहावयास मिळतो. प्रभु श्री. रामचंद्राच्या नामाचा किरीट सोमय्या यांनी अवमान केला आहे. किरीट सोमय्या हे भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पहणारे कावेबाज विरोधकांना सत्तेच्या बळावर वेठीस धरतो, तोच किरीट सोमय्या हा माया – बहीणींच्या इज्जीतीवर हात टाकतो, ही बाब निंदनीय असुन गुन्हेगारी विकृतीचे दर्शन घडविणारी आहे. त्याच्यामध्ये आचारांची आणि विचाराची विकृती आहे. आया – बहीणींचे रक्षण करणे, सरंक्षण देणे, मान सन्मान करणे, त्यांचे स्वातंत्र अबाधीत ठेवणे हे आपले कर्तव्य असतांना राज्याचे, देशाचे, गृहमंत्री हया किरीट सोमय्याला पाठीशी घालणार की कठोर कारवाई करणार ? सत्तेचा गैरवापर करून भाजपा हे निंदणीय गुन्हेगारी प्रवृत्तीचे प्रकरण दडपुन टाकणार ? असे जर होणार असेल तर पाचोरा तालुका शिवसेना (उ.बा.ठा.) हे कदापि सहन करणार नाही. रस्त्यावर उतरणार, आंदोलन करणार, माया- बहीणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार. सदर प्रकरणाची सखोल चौकशी होवुन कठोर कारवाई करावी. तसेच आमच्या भावना शासन दरबारी कळवाव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि पुढील होणा-या परिणामांना प्रशासन जबाबदार राहील. अशा आषयाचे निवेदन उबाठा सेनेतर्फे तहसिलदार प्रविण चव्हाणके व पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांना देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.