‘प्रोजेक्ट टायगर’ला भेट देण्याअगोदर चर्चेत मोदींचा स्टायलिश लूक

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) रविवारी कर्नाटकातील बांदीपूर आणि मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाला (Mudumalai Tiger Reserve) भेट देणार आहेत. ते कर्नाटकला (Karnataka) रवाना झाले आहेत. दरम्यान त्यांचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये ते काळी टोपी, खाकी पँट, प्रिंटेड टी-शर्ट आणि काळे शूज, एका हातात जॅकेट घेतलेलं दिसत आहे. या शैलीत आज पीएम मोदी सफारी टूरचा आनंद घेणार आहेत.

पंतप्रधान रविवारी म्हैसूरमध्ये ‘प्रोजेक्ट टायगर’ला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एका मेगा इव्हेंटमध्ये व्याघ्रगणनेची आकडेवारी जाहीर करतील. ते ‘अमृत काल’ दरम्यान व्याघ्र संवर्धनासाठी सरकारचे व्हिजन देखील जाहीर करतील आणि आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स अलायन्स (IBCA) लाँच करतील. त्याच सरम्यान पंत प्रधान नरेंद्र मोदींचा फोटो चर्चेत आला आहे.

पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर निलगिरी जिल्ह्यात आणि परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. एमटीआर अधिकाऱ्यांनी 7 एप्रिल ते 9 एप्रिल या कालावधीत झोनमधील हॉटेल, हत्ती सफारी आणि पर्यटक वाहने तात्पुरती बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.