मधमाश्यांच्या हल्ल्यात २ जणांचा मृत्यू

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

 

नागभीड (Nagbhid) तालुक्यात सातबहिणीचा डोंगर येथे महादेवाचे मंदिर आहे. या डोंगरावर मोठ्या प्रमाणात मधमाश्यांचे पोळे आहेत. काल दुपारी देवदर्शनासाठी अनेक भाविक गेले होते. याचवेळी दुपारी अचानक मधमाश्यांनी (Honey Bee Attack) भविकांवर हल्ला केला. मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये चार जण जखमी झाले आहेत. चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यामध्ये नागभीड तालुक्यातील सातबहिणीचा डोंगर येथे ही घटना घडली आहे. अशोक मेंढे आणि गुलाबराव पोचे यांचा समावेश असून या दोघांचं वय अंदाजे ६० वर्ष आहे. डोंगर अतिशय अवघड असल्याने दोन्ही वृद्ध घाईने खाली उतरू शकले नाहीत आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. रात्री उशिरा स्थानिक स्वयंसेवी संस्था कार्यकर्त्यांच्या मदतीने मृतदेह खाली आणण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.