Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    • नीट पेपर फुटी प्रकरणात पेपर सेटर्सनीच केला घात!
    • जेष्ठ्य अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राष्ट्रीय»अरे देवा ! ऑर्डर केला लॅपटॉप अन् आले साबण
    राष्ट्रीय

    अरे देवा ! ऑर्डर केला लॅपटॉप अन् आले साबण

    Tushar BhambareBy Tushar BhambareSeptember 29, 2022No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

    आजकाल आपण सर्वच गोष्टी ऑनलाईन (Online) मागवत असतो. वस्तूंपासून ते खाण्याच्या पदार्थांपर्यंत.. तसेच आपण ऐकलही असेल की बऱ्याचदा ऑनलाईन मागवलेल्या वस्तू खराब किंवा दुसरीच वस्तू पाठवली जाते. अशीच एक घटना उघडकीस आलीय. एका व्यक्तीने ऑनलाईन पद्धतीने लॅपटॉप (Laptop) मागवला आणि चक्क कपडे धुण्याचे साबण आले. तसेच याविषयी संबंधित कंपनीला जाब विचारला तर धक्कादायक उत्तर मिळालं.

    कारवाई करण्यास नकार

    एका व्यक्तीला ई-कॉमर्स वेबसाइट (E-commerce website) फ्लिपकार्टवरून (Flipkart) आपल्या वडिलांसाठी लॅपटॉप ऑर्डर केल्यानंतर त्या ऐवजी जे पार्सल आले त्यामुळे त्याला मोठा धक्काच बसला. यानंतर जेव्हा त्या व्यक्तीने कंपनीकडे तक्रार केली तेव्हा त्याला आणखी एक धक्का बसला, त्याला ‘नो रिटर्न पॉलिसी’चे कारण देत कोणतीही कारवाई करण्यास नकार देण्यात आला.

    नेमकं प्रकरण काय ?

    यशस्वी शर्मा हे आयआयएम अहमदाबादचे विद्यार्थी आहे. त्यांनी फ्लिपकार्ट वर सुरू असलेल्या बिग-बिलियन डे सेलवर आपल्या वडिलांसाठी लॅपटॉप ऑर्डर केला. मात्र, जेव्हा त्यांच्या वडिलांनी डिलिव्हरी बॉयकडून ऑर्डर घेतल्यानंतर पॅकेट उघडले तर त्यामध्ये कपडे धुण्याचा साबून आला होता. यानंतर यशस्वी यांनी लिंक्डइनवर एका लांबलचक पोस्ट टाकली. त्यात त्यांनी त्यांच्यासोबतची घटना शेअर केली आहे.

    लॅपटॉपऐवजी साबणाचा बॉक्स

    त्यानी लिहिले की, मी फ्लिपकार्टवरून वडिलांसाठी लॅपटॉप ऑर्डर केले होते. मात्र, वडिलांनी बॉक्स उघडला तेव्हा लॅपटॉपऐवजी साबणाचा बॉक्स सापडला. याबाबत त्यांनी फ्लिपकार्ट कस्टमर केअरकडे तक्रार केली असता त्यांनी आपली चूक मान्य करण्यास नकार दिला. यशस्‍वीने त्‍यांना डिलिव्‍हरीचे सीसीटीव्‍ही फुटेज असल्‍याचे सांगितले असल्याचेही सांगितले तरी कंपनीने ‘नो रिटर्न पॉलिसी’चे कारण देत यशस्‍वी यांना नकार दिला. डिलिव्हरी बॉयसमोर बॉक्स उघडायला हवा होता, ही चूक पीडित यशस्वीने मान्य केली आहे.

    ‘ओपन बॉक्स डिलिव्हरी’

    दरम्यान ते पुढे म्हणाले की, माझ्या वडिलांना फ्लिपकार्टच्या ‘ओपन बॉक्स डिलिव्हरी’ याबाबत माहिती दिली नव्हती. पण ओटीपी घेताना डिलिव्हरी बॉयने हे सांगायला हवे होते. वडिलांना न कळवता तो ओटीपी देऊन निघून गेला. तो गेल्यानंतर वडिलांनी पॅकेज उघडले तेव्हा त्यात लॅपटॉपऐवजी कपडे धुण्याचा साबण निघाला.

    सोशल मीडियावर जोरदार व्हायरल

    ग्राहकाने ही बाब सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडली आहे. त्यांनी फ्लिपकार्टचे सीईओ कल्याण कृष्णमूर्ती आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनाही त्यांच्या पोस्टमध्ये टॅग केले आहे. हे प्रकरण सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

    E-commerce website Flipkart Flipkart CEO Kalyan Krishnamurthy laptop New Delhi Online Fraud Union Minister Piyush Goyal viral
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

    May 18, 2026

    भाजप कार्यालय फोडलं : १५-२० हल्लेखोरांचा हल्ला!

    May 12, 2026

    ७१७ सरकारी दारूची दुकाने तातडीने बंद करा!

    May 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif