व्होडाफोन – आयडियाच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

व्होडाफोन – आयडियाच्या (Vodafone – Idea) ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. नोव्हेंबरपासून व्होडाफोन आयडिया कंपनीच्या ग्राहकांना कनेक्टिव्हिटीबाबत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

१० हजार कोटी रुपये थकित
कारण सध्या या कंपनीकडे टॉवर कंपन्यांचे १० हजार कोटी रुपये थकित आहे. यापैकी इंडस टॉवरचा (Indus Tower) हिस्सा ७ हजार कोटी रुपये इतका आहे. त्यामुळे इंडस टॉवरने व्होडाफोन आयडिया कंपनीला थकित रक्कम भरण्याचे म्हटले आहे. थकित रक्कम न भरल्यास नोव्हेंबर महिन्यापासून या कपंनीला टॉवर वापरू दिले जाणार नाही, असा इशारा इंडस कंपनीने दिला आहे. यामुळे व्होडाफोन आयडिया कंपनीच्या ग्राहकांना कनेक्टिव्हिटीची समस्या होऊ शकते.

थकबाकी जमा करण्याचा इशारा

माध्यमांतील अहवलांनुसार, इंडस कंपनीच्या बोर्डची बैठक झाली होती. यामध्ये कंपनीच्या आर्थिक स्थितीवर चर्चा झाली. यात व्होडाफोन आयडिया कंपनीवर ७ हजार कोटींची थकबाकी असल्याचे समोर आहे. सर्वात अधिक थकबाकी याच कंपनीची होती. त्यामुळे, इंडस कंपनीने व्होडाफोन आयडिया कंपनीला सर्व थकबाकी पूर्ण करण्याचे म्हटले आहे.

वोडाफोनची हाल नाजूक

रिलायंस जिओ आणि एअरटेल नंतर वोडाफोन आयडिया ही देशातील तिसरी मोठी टेलिकॉम कंपनी (Telecom Company) आहे. मात्र कंपनीची आर्थिक स्थिती बरी नसून तिच्यावर मोठे कर्ज आहे. कंपनी घाट्यात असल्याने तिने अद्याप ५ जी सेवा लाँच केलेली नाही. कंपनी कर्ज आणि इक्विटीच्या माध्यमातून २० हजार कोटी रुपये जुळवण्याचा प्रयत्न करत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.