Tuesday, May 24, 2022

३ लाखात व्यावसायिकाची ऑनलाईन फसवणूक; गुन्हा दाखल

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

जळगाव शहरात एका व्यक्तीची तब्बल ३ लाख रूपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. चहा विक्री व्यवसायाच्या नावाखाली ही फसवणूक करण्यात आली असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

जळगाव शहरातील मेहरूण भागातील शेरा चौक येथील रहिवासी शेख अहमद हुसेन गुलाम हुसेन (वय ४८) हे व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. २३ जानेवारी २०२२ रोजी त्यांना अनोळखी नंबरवरून तीन फोन आला. पहिल्या नंबरवरून साबीर खान, दुसऱ्या नंबरवरून पप्पु खान आणि तिसऱ्या अनोळखी नंबरवरून तौसिफ खान असे नावे सांगितले. यावेळी शेख अहमद हुसेन यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधून आसाम येथील ‘पर्ल टी’चा व्यवसाय करण्यासाठी सांगितले.

दरम्यान शेख अहमद हुसेन यांना ‘झायका टी’ चा ब्रॅड बनविण्यासाठी तिघांनी फोन पे आणि दिल्या खाते क्रमांकाच्या माध्यमातून पैसे मागितले. तिघांच्या सांगण्यावरून शेख अहमद हुसेन यांनी २३ जानेवारी ते १ एप्रिल या कालावधीत वेळोवळी एकुण ३ लाख रूपये ऑनलाईन व खात्यावर जमा केले.

३ लाख रुपये भरून सुद्धा चहाचा कोणताही माल न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेख अहमद हुसेन यांनी शुक्रवार १ एप्रिल रोजी सायंकाळी सायबर पोलीसात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तींविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या