टॅक्सी चालकाला लुटले; गुन्हा दाखल

0

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील बसस्थानकाजवळ टॅक्सी अडवून पाच जणांनी दमदाटी करत चालकाच्या खिशातून ६ हजार ३०० रुपये जबरी चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यासंदर्भात चोपडा शहर पोलीस ठाण्यात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हारुन शेख कमरुद्दोन शेख (वय ५२, रा. के.जी.एन कॉलनी, चोपडा) हे टॅक्सी चालक आहे. टॅक्सी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ३० जानेवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास ते चोपडा शहरातील बसस्थानकाकडून घरी जाण्यासाठी टॅक्सी क्रमांक (एमएच १९ वाय ०९२९) ने जात असताना त्यांना भैय्या पाटील, टाकल्या गवळी (पुर्ण नाव माहित नाही) आणि सोबत असलेले अनोळखी तीन जण असे एकूण ५ जणांनी कार आडवून त्यांना दमदाटी केली.

तर इतरांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांच्या खिशातील ६ हजार ३०० रूपयांची रोकड काढून चोरून नेले. याप्रकरणी टॅक्सीचालक हारून शेख यांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी भैय्या पाटील, टाकल्या गवळी आणि सोबत असलेले अनोळखी तीन जण यांच्याविरोधात चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण करीत आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.