एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसांसह एकाला अटक…

0

 

नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क:

नंदुरबार शहर पोलीस ठाण्याने कारवाई करत शहरातील मच्छीबाजार परिसरातून एका व्यक्तीकडून १ अवैध गावठी बनावटीचे पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी संबंधिताला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, दि.२८ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री नंदुरबार शहरात मच्छी बाजारात एका व्यक्तीकडे गावठी बनावटीचे पिस्टल असून तो ते विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय बातमी नंदुरबार विभागाचे उपविभागीय अधिकारी सचिन हिरे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.

नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तातडीने नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोउनि सागर आहेर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे पोहेकॉ अतुल बिर्‍हाडे, पोहेकॉ जगदिश पवार, पोना भटु धनगर, पोना बलवींद्र ईशी, पोना स्वप्निल शिरसाठ, पोशि अफसर शहा, पोशि अनिल बडे, पोशि विजय नागोडे यांची दोन पथके तयार केली. सदर पथकांनी मच्छी बाजार परिसरात सापळा रचला असता मच्छी बाजाराजवळील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयाशेजारी असलेल्या मोकळया मैदानातील पाण्याच्या टाकीजवळ एक इसम हा संशयितरीत्या फिरतांना दिसून आला.

तो वांरवार त्याच्या कमरेला हात लावत असल्याचे दिसून आल्याने पोलीसांनी लागलीच दोन पंचाना बोलावून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात २० हजार रपये किमतीचे एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तुल व दोन पिवळया धातुचे जिवंत काडतुसे मिळून आले. सदर वस्तू पोलीसांनी जप्त केल्या.

पोलीस पथकाने त्यास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जावू लागला. त्यामुळे पोलीस पथकाने अत्यंत शिताफीने पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. पांडुरंग बाबुराव प्रजापती (५६) रा.अहिल्याबाई विहिरीजवळ, कुंभारवाडा, नंदुरबार असे त्याचे नाव आहे.

त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३ चे उल्लंघन २५ सह महा. पो.का.कलम ३७(१)(३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणार्‍या गुन्हेगारांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. भविष्यात कोणी अवैध शस्त्र जवळ बाळगल्यास त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीसांनी दिला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रविंद्र कळमकर, पोउनि सागर आहेर, पोहेकॉ अतुल बिर्‍हाडे, पोहेकॉ जगदिश पवार, पोना भटू धनगर, पोना बलविंद्र ईशी, पोना स्वप्निल शिरसाठ, पोशिअनिल बडे, पोशि विजय नागोडे, पोशि अफसर शहा यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.