१२ डिसेंबरला शिवसेनेच्या पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगात सुनावणी…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

१२ डिसेंबर २०२२ ला शिवसेनेच्या पक्ष चिन्हाबाबत आता निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या वेळी शिवसेनेच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर ठाकरे गट आणि शिंदे गट हे समोरासमोर युक्तिवाद करणार आहेत. दोन्ही गटांचे वकील हे निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद करणार आहेत. त्यामुळे एकिकडे सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना दुसरीकडे आता निवडणूक आयोगासमोरही शिवसेनेच्या चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं होतं. धनुष्यबाण चिन्हावर दोन्ही गटांनी आपापला दावा सांगितला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने हे चिन्ह तात्पुरतं गोठवलं होतं. याविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सोबतच निवडणूक आयोगासमोरही सुनावणी सुरू होणार आहे.

शिवसेनेचं निवडणूक चिन्ह (Shiv Sena’s party symbol) धनुष्यबाण गोठविल्यानंतर ठाकरे गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ‘निवडणूक आयोगाने आमचं म्हणणं ऐकूण न घेता निर्णय घेतला, असा दावा ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.