नवी दिल्ली ;- हमासच्या दहशतवाद्यांनी गाझापट्टीतून तब्बल 5 हजारांवर रॉकेट्स डागल्यानंतर इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन युद्धाचा भडका उडाला. या हल्ल्यानंतर इस्त्रायलची परिस्थिती चिंता वाढवणारी आहे. यातच बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरुचा इस्त्रायलमध्ये अडकल्याची बातमी समोर आली होती. मात्र ती सुरक्षित असून भारतात परतत असल्याची बातमी समोर आली आहे.नुसरत एका आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी इस्त्रायलला गेली होती. मात्र याच दरम्यान युद्ध सुरु झाले आणि नुसरत तिथे अडकली. तिच्या टीमचाही तिच्याशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे सर्वांनाच तिची चिंता लागली होती. मात्र आता ती सुरक्षित आहे.
मात्र नुसरत भरुचाच्या टीमच्या संचिता त्रिवेदीचा नुसरतशी संपर्क झाला आहे. ती सुरक्षित असून इस्त्रायलमधून बाहेर पडण्यासाठी विमानतळावर दाखल झाली आहे. लवकरच ती देशात परतणार असल्याचे सांगण्यात आले आहे.