ऑस्ट्रेलियन प्राधिकरणाच्या ताब्यातून आपल्या दोन मुलांच्या सुटकेत अपयशी; ४५ वर्षीय एनआरआय महिलेची भारतात आत्महत्या…

0

 

धारवाड, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

कर्नाटकच्या बेळगावी जिल्ह्यात ४५ वर्षीय एनआरआय महिलेनं आत्महत्या करत आयुष्य संपवलं आहे. ऑस्ट्रेलियातील नियम अतिशय कठोर असल्यानं इंजिनीअर महिलेला तिच्या मुलांची सुटका करण्यात अपयश आलं. ऑस्ट्रेलियन प्राधिकरणाच्या ताब्यात असलेल्या दोन मुलांच्या सुटकेच्या प्रयत्नात असलेली महिला वैफल्यग्रस्त अवस्थेत होती, त्यामुळे तिने टोकाचा निर्णय घेतला.

मूळच्या कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्याच्या रहिवासी असलेल्या ४५ वर्षीय प्रियदर्शनी पाटील त्यांचे पती लिंगराज पाटील आणि मुलगा अमर्त्य (१७) आणि मुलगी अपराजिता (१३) यांच्यासोबत ऑस्ट्रेलियात राहत होत्या. पाटील कुटुंब सिडनीत स्थिरस्थावर झालं होतं. अमर्त्य आजारी पडला. त्याच्या उपचारादरम्यान हलगर्जीपणा झाल्याचा ठपका स्थानिक प्रशासनानं ठेवला. त्यानंतर दोन्ही मुलांना प्रशासनानं आपल्या ताब्यात घेतलं. त्यामुळे प्रियदर्शनी मुलांपासून दुरावल्या.

मुलांची ताटातूट होताच प्रियदर्शनी यांनी अमर्त्यवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल केली. पण ऑस्ट्रेलियन प्राधिकरणानं डॉक्टरांविरोधात गु्न्हा दाखल करण्याऐवजी प्रियदर्शनी यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद केली. मुलांची नीट काळजी न घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला. स्थानिक नियमांचा दाखला देत स्थानिक प्रशासनानं दोन्ही मुलांचा ताबा घेतला. तेव्हापासून अमर्त्य आणि त्याची बहीण पालकांपासून वेगळे राहत होते.

प्रियदर्शनी यांनी मलाप्रभा नदीत उडी घेतली. बंगळुरूत पोहोचल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रियदर्शनी यांनी आत्महत्या केली. १९ ऑगस्टला त्यांनी धारवाडमधील त्यांच्या घरी जाण्यासाठी तिकीट काढलं. मात्र त्या घरी गेल्याच नाहीत. त्यांनी हुबळीला जाणारी बस पकडली. त्यांनी रोकड आणि दागिने असलेलं पार्सल वडिलांच्या घरी कुरिअरनं पाठवून दिलं.

Leave A Reply

Your email address will not be published.