WWE चॅम्पियन ब्रे व्याटने घेतला जगाचा निरोप…

0

 

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

माजी WWE हेवीवेट चॅम्पियन ब्रे व्याटने जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या 36 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेणे थोडं आश्चर्यचकित करणारं आहे. ब्रे व्याट हा wwe च्या कुशल कुस्तीपटूंपैकी एक होता. त्याचा जन्म अमेरिकेतील फ्लोरिडा शहरात झाला. ट्रिपल एचने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्यांच्या मृत्यूची बातमी दिली.

डब्ल्यूडब्ल्यूईचे मुख्य अधिकारी ट्रिपल एच यांनी त्यांच्या ट्विटर (एक्स) अकाऊंटद्वारे ही माहिती दिली. त्यांनी लिहिले, “मला नुकताच हॉल ऑफ फेमर माईक रोटुंडाचा कॉल आला जो म्हणाला, विंडम रोटुंडा ज्याला ब्रे व्याट असेही म्हणतात. त्यांचे आज निधन झाले. आमच्या सहानुभूती त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. यावेळी प्रत्येकाने त्यांच्या गोपनीयतेचा आदर करावा अशी आम्ही विनंती करतो.”

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्रे व्याटचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या वर्षाच्या सुरुवातीला त्याला कोविड 19 झाला होता. त्यामुळे त्याचा हृदयविकार जरा जास्तच वाढला होता. त्यामुळे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. 2009 मध्ये, त्याने फ्लोरिडा चॅम्पियनशिप कुस्तीमध्ये प्रथमच पदार्पण केले. एप्रिल 2009 मध्ये तो पहिल्यांदा टीव्हीवर दिसला.

Leave A Reply

Your email address will not be published.