हृदयद्रावक; ना उपचार, ना रुग्णवाहिका! बाईकच्या डिक्कीत मुलाचा मृतदेह घेऊन निघाला बाप…

0

 

सिंगरौली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

मध्य प्रदेशातील सिंगरौली येथून हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. आपल्या नवजात मुलाचा मृतदेह नेण्यासाठी एका असह्य वडिलांना रुग्णवाहिका न मिळाल्याने त्यांनी बाईकच्या डिक्कीत मुलाचा मृतदेह घेऊन डीएमचे कार्यालय गाठले. हे पाहून जिल्हाधिकारीही अचंबित झाले. असह्य वडिलांनी जिल्हाधिकार्‍यांना आपलयाला झालेला त्रास कथन केला, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी एसडीएमला चौकशीचे आदेश दिले आहेत.

 

तपासणीसाठी खाजगी दवाखान्यात पाठवले

शेजारच्या उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात राहणारे दिनेश भारती हे पत्नीच्या प्रसूतीसाठी सिंगरौली येथील जिल्हा रुग्णालयात पोहोचले होते. सिंगरौली जिल्हा रुग्णालयातील एका डॉक्टरने प्रसूतीपूर्वी काही चाचण्यांसाठी पत्नीला खासगी दवाखान्यात पाठवल्याचा आरोपही दिनेश यांनी केला. सिंगरौलीचे जिल्हाधिकारी राजीव रंजन मीना यांनी सांगितले की, उपविभागीय दंडाधिकारी (SDM) यांच्या नेतृत्वाखालील एक पथक या आरोपांची चौकशी करेल आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

गंभीर आरोप

भारती यांनी आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की, रविवारी तो आपल्या गर्भवती पत्नीला सरकारी रुग्णालयात घेऊन गेला तेव्हा तेथे काम करणाऱ्या महिला डॉक्टरांनी आपल्या खासगी दवाखान्यात जाण्यास सांगितले. क्लिनिकमध्ये, काही अल्ट्रासाऊंड चाचण्यांसाठी जोडप्याकडून 5,000 रुपये आकारण्यात आले होते. त्यांनी सांगितले की त्यांच्या पत्नीने सोमवारी जिल्हा रुग्णालयात मृत मुलाला जन्म दिला. पत्नी आणि मृत मुलाला घरी नेण्यासाठी रुग्णवाहिका मागितली असता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मदत केली नाही, असा आरोप त्यांनी केला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी ते दुचाकीच्या ट्रंकमध्ये मृत मुलाला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. यानंतर त्यांच्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.