मतदार यादीत दुरुस्ती करून पूर्ववत करण्यासाठी यावल तहसीलदारांना निवेदन…

0

 

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क:

चुंचाळे ग्रामपंचायतच्या (Chunchale Gram Panchayat) प्रारूप मतदार याद्या १३/१०/२०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या. या याद्यांमध्ये वार्ड क्रमांक तीनच्या मतदारांची नावे वार्ड क्रमांक दोन मध्ये समाविष्ट झालेली आढळून आली आहे. त्यामुळे ज्यांची नावे वार्ड क्रमांक दोन मध्ये समाविष्ट झाली त्या मतदारांनी वैयक्तिक व सामूहिक रित्या १७/१०/२०२२ रोजी तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे या यादीवर हरकत घेतली आहे. मतदारांची यादी पूर्ववत करून दुरुस्ती करण्यात यावी या आयशाचे निवेदन यावेळी संबंधित नागरिकांकडून तहसीलदार महेश पवार यांना देण्यात आले आहे.

निवेदन देते प्रसंगी स्वराज फाउंडेशनचे (Swaraj Foundation) अध्यक्ष भरत चौधरी, दीपक कोळी, इताबर तडवी, रहेमान तडवी, फिरोज तडवी, लुकमन तडवी, जावेद तडवी, शेखर तडवी, कादिर तडवी आदी उपस्थि होते.

Leave A Reply

Your email address will not be published.