सावधान.. दिवाळीसाठी मिठाई घेताय, तपासा या गोष्टी..

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

काही दिवसांवर दिवाळी आली असून सगळ्यांच्याच घरात फराळाची लगबग सुरू आहे. तसेच आपण बाजारामधूनही अनेक प्रकारच्या मिठाया विकत आणतो. पण या मिठाया घेताना मात्र सावध राहा कारण दिवाळीत मिठाईमध्ये भेसळ असू शकते. यामुळे आपल्या आरोग्यावर घटक परिणाम होण्याची शक्यता असते. मग भेसळ ओळखायची कशी ?

१. खाण्याचा रंग की भेसळ 

जास्त रंग असलेल्या मिठाई खरेदी करणे शक्यतो टाळावे. मिठाई खरेदी करताना मिठाई आधी हातावर घेऊन पाहावे. जर मिठाईचा रंग हाताला लागला, तर शक्यतो ती मिठाई घेऊ नये. मिठाईवर रंग येण्यासाठी मेटानिल येलो आणि टारट्राजाइनचा वापर अधिक केला जातो. हे रंग आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतात. या रंगामुळे किडनी खराब होण्याचा अधिक धोका असतो. तेव्हा शक्यतो रंगबिरंगी मिठाई घेणे टाळलेलेच चांगले असते.

२. खव्यात भेसळ

मिठाईतील बरेचसे प्रकार साधारणपणे खव्यापासून बनवतात. दिवाळीच्या काळात बाजारात मागणी जास्त असल्याने खवा किंवा मेवा यातली भेसळ शोधण्यासाठी घरच्या घरी करता येईल असा एक सोपा उपाय आहे. या पदार्थावर आयोडीनचे दोन थेंब टाकावे. जर हा रंग काळा पडला तर, मेवा भेसळयुक्त आहे असे समजावे.

३. मिठाई ताजी की शिळी?

मिठाई विकली गेली नाही तर ती दुकानात काही दिवसांसाठी तशीच पडून राहीलेली असू शकते. अशावेळी एकतर वास घ्या. आंबूस वास येत असेल तर मिठाई घेऊ नका. मिठाईवर बुरशी तर नाही ना खात्री करा. मिठाईचा तुकडा जमलं तर तोडून पाहा, म्हणजे शिळ्या मिठाईचा कोरडेपणा कळण्यास मदत होईल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.