नितीश कुमार राजीनामा देताच पुन्हा सत्तेत…

0

 

पटना, लोकशाही न्यूज नेटवर्क;

बिहार मध्येही ऑपरेशन लोटस होण्याच्या आधीच नितीश यांनी सावध भूमिका घेत भाजपचा हात सोडून, महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्येही (Bihar) महाविकासआघाडीच्या प्रयोगाची पुनरावृत्ती करत महागठबंधन सरकार स्थापन केले आहे. नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी भाजपची साथ सोडत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांना भेटून नितीश कुमार यांनी राजीनामा दिला. राज्यपालांकडे राजीनामा देतानाच नितीश कुमार यांनी आमदारांच्या समर्थनाचं पत्रही राज्यपालांना दिलं आहे.

बिहारच्या राज्यपालांची भेट घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. 7 पक्षांचे 164 आमदार आणि अपक्षांच्या मदतीने बिहारमध्ये महागठबंधन सरकार बनवत असल्याचं नितीश कुमार यांनी सांगितलं. यावेळी नितीश कुमार यांच्यासोबत आरजेडीचे नेते तेजस्वी यादवही उपस्थित होते. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी राज्यपाल तारीख देतील, असं नितीश कुमार म्हणाले.

यांनी नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी पाठिंबा दिला आहे. आरजेडीचे 79, जेडीयूचे 45, काँग्रेसचे 19, डाव्यांचे 16 आणि एक अपक्ष असं 160 चं संख्याबळ आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.