स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांनी साजरा

0

लोकशाही न्युज नेटवर्क

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने जामनेर तालुक्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यात स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला.

जामनेर शहरातील नगरपालिका राजमाता जिजाऊ मॉसाहेब चौकात स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. अभिवादन प्रसंगी जामनेर तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बोरसे युवासेना उपजिल्हाप्रमुख राहुल चव्हाण, युवासेना तालुकाप्रमुख नरेंद्र धुमाळ, शिवसेना शहर प्रमुख अतुल सोनवणे,ज्ञानेश्वर जंजाळ, मा. शहर प्रमुख पवन माळी, तालुका संघटक विष्णू सोनवणे, शहर प्रमुख विलास पाटील, युवासेना विशाल भोई, सुधाकर सराफ,उस्मान शेख,प्रशांत सुरवाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाजीराव पाटील, किशोर मोरे,अमोल रोकडे,तुकाराम गोपाळ ,अंकुश जोशी आदी शिवसैनिक उपस्थित होते.

तसेच तालुक्यातील गंगापुरी येथे आश्रमशाळेत जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना फराळ वाटप करण्यात आले.या ठिकाणी शिवसेना जिल्हाप्रमुख दिपक सिंग राजपूत, युवासेना उप-जिल्हाप्रमुख राहुल चव्हाण,तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बोरसे,नरेंद्र धुमाळ,विशाल भोई,अंकुश जोशी,दिपक जोशी शाळेतील शिक्षक वृंद-कर्मचारी उपस्थित होते.त्याच प्रमाणे वाघारी,पहुर,शेंदुर्णी,नेरी,वाकोद, तोंडापूर, फत्तेपूर इ.ठिकाणी अभिवादन पर कार्यक्रम घेण्यात आला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने तालुक्यात एक नवीन संजीवनी शिवसेनेला प्राप्त झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.