टॉलिवूड अभिनेता सुधीर वर्मा याची आत्महत्या

0

लोकशाही न्युज नेटवर्क
विशाखापट्टणम येथील राहत्या घरी टॉलिवूड अभिनेता सुधीर वर्माने आत्महत्या केली आहे. त्यांनी सोमवारी (२३ जानेवारी) आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.
सुधीर वर्मा यांचे सहकलाकार असलेले अभिनेते सुधाकर यांनी त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून सुधीर वर्मा यांच्या आत्महत्येबद्दल शोक व्यक्त केला आहे. सुधीर वर्माच्या कुंडानापू बोम्मा चित्रपटात त्यांनी सोबत काम केले होते. सुधीर वर्मा यांनी आत्महत्येचे पाऊल कोणत्या कारणासाठी उचलले हे समजू शकलेले नाही.

मात्र काही काळापासून ते वैयक्तिक आयुष्यात अडचणीतून जात असल्याचे बोलले जात आहे. तो मानसिकदृष्ट्याही खूप दडपणाखाली होता. त्यामुळेच सुधीर वर्मा यांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलले असण्याची शक्यता आहे.

सुधीर वर्मा यांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण साउथ फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला असून सोशल मीडियावर सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे. सुधीर वर्माने 2013 मध्ये ‘स्वामी रा रा’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पण सुधीर वर्मा यांना 2016 मध्ये आलेल्या कुंदनपू बोम्मा या चित्रपटातून बरीच ओळख मिळाली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.