चिंचोलीच्या शाळेतील १२ वीचे विद्यार्थी ३२ वर्षानंतर आले एकत्र

0

लोकशाही न्युज नेटवर्क

सार्वजनिक विद्यालय चिंचोली तालुका यावल शाळेतील सन १९८९ /९० ची इयत्ता बारावीचे वर्गातील विद्यार्थी तब्बल ३२ वर्षांनी एकत्र येऊन जळगाव येथील आर्यन पार्क वर गेट-टु-गेदर समारंभ उत्साहात झाला.

याप्रसंगी बऱ्याच वर्षानंतर एकत्र आलेले मित्र व मैत्रिणींच्या चेहऱ्यावरती उत्साह संचारला होता. बरेच जण विविध क्षेत्रातशैक्षणिक,सामाजिक,शेती,व्यावसायिक,उत्तम गृहिणी म्हणुन विविध क्षेत्रात काम करत असून बऱ्याच दिवसानंतर एकत्र आल्याने पुन्हा एकदा बारावीचावर्ग भरल्याचा अनुभव विद्यार्थ्यांनी अनुभवला.जणू काही आपण चिंचोली येथील सार्वजनिक हायस्कूल मधून सहल साठीच ” आर्यन पार्क ” येथे सहलीसाठी आलोअसल्याची अनुभूती पुन्हा एकदा बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना अनुभवली. याप्रसंगी झि.तो. महाजन माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक वासुदेव महाजन व आदर्श माध्यमिक विद्यालय जळगावची उपशिक्षिका साै.मनीषा चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सर्वच एकत्रित आलेल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून देतांना आपण कोणत्या क्षेत्रात कार्य करत आहोत याचेही माहिती करून दिली. बरेचसे वर्गातील मूल व मुली विविध नामांकित कंपनीत व विविध शैक्षणिक क्षेत्रात तसेच विदेशात नोकरी व कार्य करत असल्याचे प्रत्येकाने सांगितले.

याप्रसंगी बऱ्याच वर्षानंतर एकत्र आल्याने विविध स्मृतींना उजाळा मिळाला. जणू काही पुन्हा एकदा आपला बारावीचा वर्ग भरला असल्याची अनुभूती सर्वांनी अनुभवली. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासुदेव महाराज यांनी तर आभार अल्का तायडे यांनी मानलेत. याप्रसंगी सुनील साठे,बापुराव पाटील ( चिंचोली ),नंदुलाल महाजन,वासुदेव महाजन,शालु महाजन (धानोरा ),सौ प्रतिभा पाटील ( नागपूर ),सौ.मंजुषा पाटिल, मनीषा चौधरी ( जळगाव ),शोभा महाजन ( नाशिक ),अल्का तायडे (जामनेर),साै.प्रतिभा सावळे,साै.हेमलता चाैधरी (भुसावळ ),अजय पाटील संजय,साै.भारती पाटील,साै.वंदना चाैधरी,साै.भारती वराडे, संजय चौधरी ( किनगाव ) आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.