मंत्री महाजनांच्या प्रतिमेला राष्ट्रवादीने फासले काळे

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

माजी मंत्री एकनाथ खडसे व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्यातील शाब्दिक वाद आता माध्यमातून रस्त्यावर आला आहे. काँग्रेस शरद पवार गटातर्फे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिमेला काळे फासून जोडे मारण्यात आले.

आमदार एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध केलेल्या वक्तव्याचा काँग्रेस शरद पवार गटातर्फे निषेध करण्यात आला. शहरातील आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. ‘नाथाभाऊ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘गिरीश महाजन हाय… हाय…’ अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. खडसे यांनी दिलेले आव्हान महाजन यांनी स्वीकारावे, असे आवाहनही कार्यकर्त्यांनी केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, युवक महानगराध्यक्ष रिंकू चौधरी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष इब्राहिम तडवी, सामाजिक न्याय महानगराध्यक्ष रमेश बाऱ्हे, सुनील माळी, राजू मोरे, किरण राजपूत, भाऊराव इंगळे, मनोहर कोचुरे, डॉ. संग्राम सूर्यवंशी, डॉ. राहुल उदासी, हितेश जावळे, आकाश हिवाळे, गणेश पाटील, पंकज तनपुरे, योगेश साळी, सुहास चौधरी, राजा मिर्झा, बशीर शहा, फैज खाटिक, नईम खाटिक, रहीम तडवी, मुश्ताक खाटिक, खलील खाटिक, फैज शहा, मतीन सय्यद, अकबर पठाण, राहुल टोके, हारून शेख, अखिल शेख आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.