ट्रकमधून डिझेल चोरतांना एकाला अटक; तिघे फरार

0

धरणगाव :- रस्त्याच्याकडेला ट्रक उभा करुन कॅबीनमध्ये झोपलेल्या चालकाच्या गळ्याला चाकू लावित डिझेल चोरणाऱ्या एकाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही घटना धरणगावमधील चोपडा रस्त्यावरील आयटीआयजवळ घडली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगावमधील चोपडा रस्त्यालगत आयटीआय लगत उभ्या असलेल्या (एनएन ०१ एएफ ९८३०) क्रमांकाच्या ट्रकच्या कॅबीनमध्ये पानसिंग धाकर रा. राणीपुरा ता. जवैरा, जि. मुरेना मध्यप्रदेश हे झोपलेले होते. चोरट्याने चालकाच्या गळ्याला धारदार चाकू लावून त्याला आरडाओरड केल्यास जीवेठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्याच्या ट्रकमध्ये असलेले ११ हजार रुपयांचे १२० लिटर डिझेल चोरुन नेले. दरम्यान, चोरी करतांना अचानक पोलिसांची गाडी आल्याने पोलिसांनी गोलू उर्फ प्रशांत नवनाथ देवकाते (वय २७, रा. धुळे) याला रंगेहाथ पकडले. तर त्याचे अन्य तिघ साथीदार पळून गेले. याप्रकरणी शवेद्रसिंह आदीराम धाकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जिभाऊ पाटील हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.