पंतप्रधान मोदींच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज बाद…

0

 

वाराणसी, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

वाराणसी लोकसभा मतदारसंघातून कॉमेडियन श्याम रंगीला उर्फ ​​श्याम सुंदर यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. वाराणसी मतदारसंघातून १४ मेपर्यंत एकूण ४१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. श्याम रंगीला हे मिमिक्री आर्टिस्ट आहेत आणि ते पीएम मोदी आणि राहुल गांधींसह अनेक नेत्यांची नक्कल करतात. यामुळे ते अनेकवेळा वादात सापडले होते.

या कारणास्तव नामांकन नाकारण्यात आले

श्याम रंगीला यांनी शपथपत्र दाखल न केल्यामुळे उमेदवारी नाकारण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. रंगीला यांनी वाराणसीमधून उमेदवारी दाखल केल्यानंतर एका दिवसानंतर ही माहिती समोर आली आहे. रंगीला यांनी यापूर्वी दावा केला होता की, त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखण्यात आले होते.

१ जून रोजी मतदान होणार आहे

उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय हे वाराणसीतून इंडिया अलायन्सचे उमेदवार आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीएचे उमेदवार आहेत. मायावतींचा पक्ष बसपने वाराणसीतून अथर जमाल लारी यांना उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यांतर्गत वाराणसीमध्ये १ जून रोजी मतदान होणार आहे.

कोण आहे श्याम रंगीला?

राजस्थानच्या हनुमानगडमध्ये जन्मलेल्या आणि वाढलेल्या रंगीलाने ॲनिमेशनचे शिक्षण घेतले. रंगीला त्याच्या मिमिक्री कौशल्यासाठी ओळखला जातो. विशेषतः तो राजकीय व्यक्तींची नक्कल करतो. 29 वर्षीय रंगीला पहिल्यांदा 2017 मध्ये प्रसिद्ध झाला जेव्हा त्याने केलेली पीएम मोदींची मिमिक्री सोशल मीडियावर व्हायरल झाली. तेव्हापासून रंगीला पंतप्रधानांच्या भाषणांची आणि मुलाखतीची नक्कल करत व्हिडिओ बनवत आहे.

रंगीलाने मोदींशिवाय राहुल गांधींसारख्या इतर राजकीय व्यक्तींचे मिमिक्री व्हिडिओही बनवले आहेत. रंगीला यांनी काही काळापासून पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या धोरणांवर टीका केली होती. खरं तर, उमेदवारी जाहीर करतानाच्या व्हिडिओमध्ये रंगीला पीएम मोदींच्या आवाजाची नक्कल करताना काही भाग होते.

Leave A Reply

Your email address will not be published.