२१ वर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या

0

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क 

 

थोरगव्हाण येथे एका २१ वर्षीय तरूणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. तरुणाला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  थोरगव्हाण ता. यावल येथील रहिवासी मच्छिंद्र विनोद पाटील (वय २१) हा तरुण शुक्रवारी दुपारी आपल्या घरी होता. दरम्यान राहत्या घरात त्याने छताच्या कडीला दोरीने बांधून गळफास घेतला. हा प्रकार कुटुंब आणि नातेवाईकांच्या निदर्शनात येताच त्याला तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयामध्ये आणण्यात आले.

यावल ग्रामीण रूग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.  याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पोलीस पाटील गजानन चौधरी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.