राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली ; अजित पवारांच्या बंगल्यावर पदाधिकाऱ्यांची हजेरी

0

मुंबई : – राष्ट्रवादीमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत अजित पवारांनी अप्रत्यक्षरित्या प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा केली होती. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय घेण्यासाठी हि बैठक होत असल्याची माहिती समोर येत आहे.

राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे देवगिरी बंगल्यावर दाखल झाले आहेत. तर अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी काही दिवसापूर्वी आपल्याला विरोधीपक्षनेते पद नको आता संघटनात्मक जबाबदारी हवी असे म्हटले होते. दरम्यान,आज राष्ट्रवादीचे आमदार, जिल्हाध्यक्ष देवगिरीवर दाखल झाले आहे. राष्ट्रवादीचे वरीष्ठ नेते दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ देखील अजित दादांच्या देवगिरी बंगल्यावर दाखल झाले आहेत. खासदार अमोल कोल्हे देखील अजितदादांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. सध्या प्रदेशाध्यक्षपदी असलेले जयंत पाटील यांनी आपल्या पदाची पाच वर्ष दोन महिने इतका कालावधी पूर्ण केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.