शतपावली करण्यास गेलेल्या महिलेची सोनसाखळी चोरट्यांनी केली लंपास

0

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील गजबजबलेल्या बुलढाणा रोडवरील बद्री कॉम्प्लेक्स, शास्त्रीनगर परिसरात दोन अज्ञात चोरट्याने मोटार सायकलवर येऊन महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पोबारा केल्याची घटना ३० जून रोजी रात्री घडली. याबाबतची माहिती अशी की, बुलढाणा रोडवर असलेल्या बद्री कॉम्प्लेक्समधील योगिता रणजितकुमार रेदासणी (वय ४७) ही महिला रात्री ९ ते १० वाजे दरम्यान बद्री कॉम्प्लेक्स समोर असलेल्या शास्त्रीनगर गजानन महाराज मंदिरा जवळील रोडावर राणी गोयंका, स्मिता अग्रवाल या मैत्रीणींसोबत वॉकींग करीत असतांना दोन अज्ञात युवकांनी मोटार सायकलवर येऊन रात्री १०.२० वाजे दरम्यान अचानक समोर येऊन मागे बसलेल्या युवकाने त्यांच्या गळ्यातील अंदाजे ६ ग्रॅम किं.३० हजार रूपये किंमतीची चैन बळजबरीने हिसकावून मोटार सायकलवरून पसार झाले. योगिता रेदासणी यांनी दिलेल्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द अप.नं.०३४५/२३ कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.