मलकापूर शहरातील घटना; विजेच्या तारेवर पडून दुर्दैवी मृत्यू! इसमाच्या मृत्यूस जवाबदार कोण..?

0

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील जुनेगाव नगारखाना असलेल्या परिसरात जैन मंदिरा शेजारी पिंपळाचे अति प्राचीन झाड आहे. त्या झाडाच्या फांद्यांची कटाई करण्यासाठी वर चढलेल्या मजुराचा खाली विजेच्या तारावर पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की मलकापूर शहरातील जुन्या गावात नगार खान्याच्या बाजूला असलेल्या प्राचीन पिंपळाच्या झाडाच्या फांद्या कापण्याकरिता जानोजी उर्फ पिंटू भारसाकडे हा मजूर चढलेला होता झाडांच्या फांद्या तोडत असताना अचानक फांदी तुटून तो खाली कोसळल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागला त्यानंतर त्याला त्वरित मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित आहे.

शहरातील जुने शगाव नगार खान्याच्या बाजूला असलेले प्राचीन 100 फुट उंचीचे हे पिंपळाचे झाड आहे या झाडाच्या फांद्या तोडण्याकरिता या मजुराला कोणी सांगितले..? असा प्रश्न उपस्थित होत आहे या दृष्टीने पोलिसांनी तपास करावा अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.