आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, पकडले इतक्या कोटींचे ड्रग्स

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

 

भारतीय नौदल आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. १२ हजार कोटी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. सूत्रांनुसार इराणमधून (Iran) १२ हजार कोटी रुपयांचे ड्रग्स भारतात (India) आणायची तयारी होती, मिळविलेल्या माहितीनुसार नौदल आणि एनसीबीची (Navy and NCB) ही खेप गुजराथच्या बंदरात पोहोचण्याआधीच पकडली गेली. यादरम्यान ड्रग्स माफियालाही अटक करण्यात आली आहे.

नौदल आणि एनसीबीने मात्र केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये अरबी समुद्रात आतापर्यंतची सर्वात मोठी ड्रग्सची खेप पकडली आहे. 2600 किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारानुसार या ड्रग्सची किंमत 12,000 कोटी रुपये आहे. 2600 किलो ड्रग्जसह पकडलेल्या माफियाला कोचीच्या बंदरात नेण्यात आले, जिथे एनसीबी आणि नौदल पुढील तपास करत आहे. आता या संपूर्ण ड्रग्ज रॅकेटमध्ये कोणाचा हात आहे, याचा शोध घेतला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.