लोहारा मार्गांवर बसेस सुरू करा; जेष्ठ नागरिक संघाची मागणी

0

लोहारा, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

सोयगाव आगाराने सोयगाव-लोहारा-जळगाव अशा दोन बसेस काही दिवसांपासून सुरू केलेल्या आहेत. वेळेत खाजगीला झुगारत या बसेसकडे प्रवाशांचा ओघ वाढून त्यांना प्रतिसाद मिळतोय, तरी लोहारा मार्गावर जळगाव-लोहारा-शेंदुर्णी या दोन फेऱ्या व जामनेर आगाराची बंद करण्यात आलेली जामनेर-लोहारा-तारखेडा हीसुध्दा मुक्कामी बस पुन्हा सुरू करण्यात यावी. अशी मागणी जिल्हा विभागीय नियंत्रक यांना ज्येष्ठ नागरिक संघ लोहारा यांकडून करण्यात आलेली आहे. निवेदनावर अध्यक्ष भास्कर अंबिकार, उपाध्यक्ष बाबूलाल सुतार, सचिव प्रभाकर चौधरी, बाबुलाल बोरसे, लक्ष्मण माळी, धोंडू धनगर यांसह शेकडो ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष यांच्या सह्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.