मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
‘तुझी माझी रेशीम गाठ’ (Tuzi Mazi Reshim Gath) हि मालिका सर्वांचाच लक्षात राहिली ती मायरा (Myra) म्हणजेच परीच पात्र साकारलेल्या चिमुकली मुळे, आता तीच मायरा पुन्हा सर्वांचाच भेटीला येणार आहे. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिका बंद झाली असली तरी प्रेक्षकांच्या मनातील परीचं घर कायम आहे. आता मायराच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. मायरा लवकरच छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे पण मराठी नाही तर चक्क हिंदी मालिकेतून.
मायराने नुकताच तिच्या सोशल मीडियावर नव्या मालिकेचा व्हिडिओ शेअर केला आहे. कलर्स वाहिनीवर (Colors channel) ‘नीरजा : एक नयी पहचान’ या मालिकेत ती दिसणार आहे. इतकंच नाही तर ही तिची मध्यवर्ती भूमिका असणार आहे. मायरा ‘नीरजा’ हेच मुख्य पात्र साकारणार आहे. माझी तुझी रेशिमगाठ मालिकेनंतर मायराला मिळालेला हा मोठा ब्रेक आहे. नीरजा मालिकेत अभिनेत्री स्नेहा वाघ (Sneha Vagh) तिच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे.