राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्षपदी मोहित महाजन

0

धानोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

धानोरा येथील युवा कार्यकर्ते मोहित संजय महाजन यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या तालुका उपाध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल पंचायत समितीचे माजी सभापती डी.पी.साळुंखे, सरपंच रज्जाक तडवी, डॉ. भरत धनगर, शशिकांत धनगर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ची ताकद वाढविण्यावर भर देणार असल्याचे मोहित महाजन यांनी सांगितले. त्यांच्या या निवडीबद्दल निखील महाजन, जगदीश पाटील, योगेश कोळी, दीपक साळुंखे, एस.पी. महाजन, हरिष चौधरी यांच्यासह कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.