तरुणांनी व्यावसायिक शिक्षणाकडे वळावे!

प्रशांत सोनवणे यांचे आवाहन: संत रोहिदास जयंती साजरी

0

धानोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

ग्रामीण भागातील सर्व समाज एकोप्याने रहात असल्याने आपली भारतीय संस्कृती टिकून आहे. आज सर्वच समाजात प्रत्येक बाबतीत प्रचंड स्पर्धा पाहण्यास मिळते. यातून आपण आपली प्रगती साधत शिक्षणाबरोबर व्यावसायिक शिक्षण घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन भुसावळ माध्यमिक शिक्षक पतपेढीचे खजिनदार प्रशांत सोनवणे यांनी केले. येथे संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी संत शिरोमणी संत रोहिदास महाराज यांची जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करून प्रसाद यांचे वाटप करण्यात आले. सोनवणे म्हणाले की, पूर्वी संतांचे महान कार्य ही आजच्या समाजात आपले आदर्श ठरत आहेत. यामुळे संताच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करुन त्यांच्या कार्याचा एक संदेश अवलंबला पाहिजे, याच बरोबर तरुणांनी स्पर्धा परीक्षेचा चांगला अभ्यास करुन प्रशासकीय सेवेत येऊन काम करावे, आपणास मिळत असलेल्या सवलतींच्या चांगला फायदा करून घेतला पाहिजे तसेच समाजकारण डोळ्यांसमोर ठेऊन राजकारणात यावे असे आवाहन केले.

यावेळी अडावद पोलिस ठाण्याचे उपनिक्षक राजू थोरात, माजी उपसभापती माणिकचंद महाजन, सरपंच रज्जाक तडवी, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष रविंद्र चौधरी, दूध संस्थेचे उपाध्यक्ष प्रवीण ठाकूर, ग्राम पंचायत सदस्य रवींद्र शिरसाठ, मुक्तार अली, अतुल पाटील, अशोक चौधरी, वासुदेव महाजन, अमोल महाजन, प्रशांत चौधरी, राजेंद्र बोदडे, अब्दुल कादीर, आरिफ तडवी, जयदीप पाटील, चर्मकार समाजाचे सुरेश सोनवणे, भास्कर सोनवणे, लक्ष्मण सोनवणे, परशुराम सोनवणे, चंद्रकांत सोनवणे, विलास सोनवणे, शांताराम सोनवणे, लोटन सोनवणे, गणेश सोनवणे, दिलीप सोनवणे, परशुराम दांडगे, अनिल निभोरे, प्रविण सोनवणे, वैभव निंबाळकर, पराशर सुरवाडे, चेतन सोनवणे, अविनाश वानखेडे, रोहन सोनवणे, अजय निंबाळकर, राहुल सोनवणे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. सूत्रसंचलन दिलीप सोनवणे यांनी तर आभार लोटन सोनवणे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.