२ मद्यधुंद महिलांनी चिरडले २ युवकांना

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

पार्टी करून घरी जात असताना मद्यधुंद महिला चालकाने २ मोपेडवर असलेल्या युवकांना कारने चिरडल्याची घटना रामझुल्यावर शनिवारी (दि.२४) मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या अपघातात जखमी दोन युवकांचा मृत्यू झाला असून तहसील पोलिसांनी दोन्ही श्रीमंतर घराण्यातील महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांचे वाहनही जप्त केले आहे.

मोहम्मद हुसैन गुलाम मुस्तफा (वय ३४, रा. नालसाहब चौक) आणि मोहम्मद आतिफ मोहम्मद जिया (वय ३२, रा. जाफरनगर) अशी दोन्ही मृतांचा नावे आहेत. माधुरी (वय ३७), रितिका (वय ३९) अशी धडक देणाऱ्या दोन्ही महिलांची नावे आहेत. रितीका कार चालवित होत्या तर बाजूला माधुरी बसल्या होत्या. दोघीही मद्यधुंद असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास रामझुल्यावरून मोहम्मद हुसैन त्याच्या मित्र मोहम्मद आतीफ मोहम्मद जिया यांच्यासह मोपेडवरून (एम.एच ३७ क्यू २९४८) सदरकडून मेयो हॉस्पिटलकडे येत होते. डाव्या बाजूने जात असताना त्यांना भरधाव येणाऱ्या मद्यधुंद असलेल्या रितिका यांनी मर्सिडिजने (एम.एच.४९, ए.एस. ६१११) मागून धडक दिली. त्यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले.

यादरम्यान मागून त्यांचे पती दिनेश तिथे आले. दोन्ही महिला आपले वाहन सोडून दिनेश यांच्या वाहनात बसून पसार झाल्या. अपघातानंतर नागरिकांचा जमाव रामझुल्यावर गोळा झाला. त्यांनी जखमी दोन्ही युवकांना मेयो रुग्णालयात नेले असता मोहम्मद हुसैन याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.