घराच्या गच्चीवरून खाली पडल्याने एकाचा मृत्यू

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

वरणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील करंजी पाचदेवळी येथे (दि २५) रविवार रात्रीच्या वेळी घराच्या गच्चीवरून खाली पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत वृत असे बोदवड तालुक्यातील व वरणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील असलेले करंजी पाचदेवळी येथील नितिन शांताराम सुरवाडे (३०) हा तरुण (दि २५) रविवारच्या रात्रीच्या वेळी जेवण झाल्यानंतर रात्री झोपण्यासाठी आपल्या राहत्या घराच्या गच्चीवर जाऊन झोपला होता. रात्री अकरा वाजेच्या सुमारास लघुशंकेसाठी खाली उतरत असताना, अचानक तोल गेल्याने घराच्या समोर पडला. आवाज आल्याने घरचे मंडळी घराबाहेर येताच त्यांना नितीन जमीनीवर पडल्याचे दिसले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे दिसताच, त्याला इतराच्या मदतीने उपचारासाठी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरानी त्याला तपासून मृत घोषित केले.

याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला पोलीस पाटील (करंजी) यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नितिन याच्या पश्चात पत्नी , एक मुलगा व आई वडिल असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.