आरोग्यासाठी पौष्टिक असा नाचणीचा हलवा, पहा रेसिपी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जेवल्यानंतर अनेकांना गोड पदार्थ खाण्याची आवड असते. परंतु, वाढत्या मधुमेहाच्या आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहावी रस्ताही अनेकजण गोडाचे पदार्थ खाणे टाळतात. पण जर तुम्हालाही गोड पदार्थ खायचे असतील तर सोपी रेसिपी ट्राय करू शकतात.

नाचणी ही आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याचे सेवन केल्यास भूक लागत नाही. नाचणी ही कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत मानला जातो. १००ग्राम नाचणीमध्ये साधारण 364 mg कॅल्शियम असते. हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी, कॉलेस्ट्रॉल, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. जर तुम्हाला देखील गोडाचा पदार्थ खायचा असेल तर, नाचणीचा हलवा ट्राय करू शकता पाहूया याची रेसिपी

1. साहित्य

  1. नाचणीचे पीठ – १/२ वाटी
  2. पीठी साखर – ४ चमचे
  3. शुद्ध तूप – १ चमचा
  4. पाणी – १/२ ग्लास
  5. बारीक चिरलेला सुका मेवा – १ चमचा
  6. दूध (Milk)

2. कृती

सर्वात आधी नाचणीचे पीठ घेऊन पॅनमध्ये चमचाभर शुद्ध तूप घाला. नंतर त्यात नाचणीचे पीठ चांगले भाजून घ्या.

पीठ हलके तपकिरी रंगाचे झाल्यास त्यात पाणी, दूध घालून हलवा घट्ट होईपर्यंत शिजवा.

त्यात थोडी पीठी साखर घालावी. यानंतर त्यात बारीक चिरलेले बदाम, काजू, पिस्ता घाला.

गरमागरम सर्व्ह करा हेल्दी आणि पौष्टिक असा नाचणीचा हलवा. मुले देखील आवडीने खातील.

Leave A Reply

Your email address will not be published.