गुगल लवकरच आणणार ‘ऑडिओमोजी’ चे नवीन फिचर 

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

आज-काल व्हाट्सअप किंवा इतर ठिकाणी टेक्स्ट करताना इमोजींचा वापर करणे सोपी गोष्ट झाली आहे. एखादा वाक्य टाईप करताना आपल्या मनात कोणती भावना आहे, हे दाखवण्यासाठी इमोजी अगदी महत्त्वाची भूमिका बजावतात मात्र आता गुगल इमोजींच्याही एक पाऊल पुढे जाण्यासाठी सज्ज झाला आहे.

मीडिया रिपोर्ट मध्ये मिळालेल्या माहितीनुसार, गुगल सध्या ‘ऑडिओमोजी’ फीचर वर काम करत आहे. सध्या ज्याप्रमाणे युजर्स एखाद्या फोटो किंवा मेसेज वर इमोजींनी रिएक्शन देऊ शकतात त्याचप्रमाणे, या नव्या पिक्चर मध्ये कॉल सुरू असताना ऑडिओ रिॲक्शन देता येणार आहे. त्यामुळे याचं नाव ‘ऑडिओमोजी’ असं असेल.

इमोजीन प्रमाणे मिळणार पर्याय

फोन कॉल सुरू असताना युजर्स मध्येच सॅड, सेलिब्रेट, लाफ, ड्रम रोल आणि पूप अशा साऊंड इफेक्टचा पर्याय वापरता येणार आहे. या साऊंडसोबतच स्क्रीनवर त्याच्याशी रिलेटेड ॲनिमेशन दिसणार आहे.

डिक्समध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, हे ऑडिओमोजी वापरल्यानंतर कॉलवर असणाऱ्या दोन्ही युजर्सला त्य- त्या रिएक्शनप्रमाणे आवज ऐकू येतील म्हणजेच समोरच्या व्यक्तीने एखादा धासू वाक्य म्हटलं तर त्यावर तुम्ही टाळ्या वाजवणाऱ्या आवाजाची रिएक्शन देऊ शकाल, तसेच एखादी महत्त्वाची घोषणा करण्यापूर्वी युजर्स ड्रम रोल देखील वाजवू शकतील.

कधी लॉन्च होणार?

हे फीचर्स सध्या डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहे. गुगलने स्वतः याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. लवकरच हे फीचर बीटा व्हर्जनवर उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पूर्ण झाल्यानंतर हे फीचर्स सर्वांसाठी उपलब्ध राहणार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.