तरुणीला शिवीगाळ करत मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

नशिराबाद येथे एका २५ वर्षीय तरूणीला किरकोळ कारणावरून मारहाण केल्याची घटना ५ मे रेाजी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील खालची अळी येथील रहिवासी असलेल्या सुचिता सचिन चौधरी (वय २५) या आपल्या कुटुंबियांसह राहतात. ५ मे रोजी दुपारी ३ वाजता घरी असतांना किरकोळ कारणावरून हरीष पुरूषोत्तम येवेले, उज्ज्वला हरीष येवेले रा. खालीची अळी, नशिराबाद यांनी शिवीगाळ करून मारहाण केली.

दरम्यान याप्रकरणी तरूणीने नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यांच्या तक्रारीवरून ६ मे रोजी सायंकाळी संशयित आरोपी हरीष पुरूषोत्तम येवेले, उज्ज्वला हरीष येवेले यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सपोनि अनिल मोरे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.