मनमाड-मालेगाव राज्य मार्गावर भरधाव एसटी बस उलटून भीषण अपघात…

0

 

नाशिक, लोकशाही नेटवर्क:

 

नाशिकमध्ये मनमाड-मालेगाव राज्य मार्गावर भरधाव एसटी बस उलटून भीषण अपघात झाला आहे. हा अपघात मालेगावपासून काही अंतरावरील राजस्थान ढाब्याजवळ झाला आहे. अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे.

पुण्याहून शिंदखेडा येथे ही बस जात होती. बसचे लायनर चिकटल्यामुळे ब्रेक न लागल्याने बस पलटी झाली. बसमध्ये एकूण 41 प्रवासी प्रवास करत होते. जखमींना मालेगावच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.