नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क
नंदुरबार जिल्ह्यातील धवल पाडा जिल्हा परिषद शाळेतील 14 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. चंद्रजोत वनस्पतीच्या बिया खाल्ल्याने या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी जेवणाच्या सुट्टीनंतर शाळेच्या परिसरात खेळत हाेते. या विद्यार्थ्यांनी चंद्रज्योत या वनस्पतीच्या बिया खाल्ल्या. त्यानंतर 13 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. त्यांना उलट्या आणि जुलाब होऊ लागले. या सर्व विद्यार्थ्यांना तातडीने धडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान सर्व 14 विद्यार्थ्यांवर धडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या विद्यार्थ्यांची तब्येत चिंताजनक नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.