लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून प्राथमिक शाळांचे वर्ग सकाळच्या सत्रामध्ये तर प्राथमिक शाळांचे वर्ग दुपारच्या सत्रामध्ये भरले जात आहे. परंतु आता ही परंपरा तोडली जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसकर यांनी शाळांच्या वेळा बदलण्याची घोषणा विधिमंडळात केली. बदलत्या जीवनशैलीमुळे पहाटे शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही. यामुळे लहान मुलांच्या शाळांची वेळ बदलण्याची सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केली होती. येत्या शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी ९ वाजेनंतरच सुरु करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसकर यांनी केली.
समितीची स्थापना करणार
महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शाळांचे वर्ग सकाळी भारतात. तर माध्यमिक शाळांचे वर्ग दुपारी भरतात. माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे वय १२ वर्षांच्या पुढे तर प्राथमिक शाळांमध्ये मुलांचे वय ३ ते १० वर्ष असते. त्यामुळे प्राथमिक शाळा दुपारी हव्यात आणि माध्यमिक शाळा सकाळी असणे गरजेचं आहे. अशी सूचना शिक्षणतज्ञांकडून येत होत्या. याबाबत राज्यपाल रमेश बैस यांनीच सूचना केली. यामुळे आता दुसरीपर्यंत प्राथमिक शाळा नऊ वाजता होणार आहे. परंतु इतर वर्गांबाबत निर्णय घेण्यासाठी समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचे दीपक केसकर यांनी सांगितले. शाळांची वेळ बदलली असल्यामुळे आता शहरी पालकांना दिलासा मिळणार आहे.