फिट आल्यामुळे तरुणाचा हौदात बुडून दुर्दैवी मृत्यू

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

रात्रपाळीच्या कामावर गेलेला तरुण कंपनीच्या आवारात असलेल्या हौदात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास एमआयडीसीत उघडकीस आली आहे. सुप्रीम कॉलनीतील साईनगर येथील रहिवासी गणेश वसंत सोनार (वय ३०) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एमआयडीसीतील जे सेक्टरमध्ये मिनाक्षी गोल्ड नावाची चटई कंपनी आहे. या कंपनीमध्ये गणेश वसंत सोनार हा तरुण कमला होता. रविवारी रात्रपाळी असल्याने रात्रीच्या वेळेस गणेश हा कामावर गेला होता. कंपनीच्या आवारात असलेल्या हौदात रात्रीच्या सुमारास गणेश हा बुडाल्याचे दिसून आले. त्यांनी लागलीच घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, किशोर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी कंपनीतील इतर कामगारांच्या मदतीने गणेशचा मृतदेह हौदातून बाहेर काढला. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करत त्याला मृत घोषित केले. यावेळी नातेवाईकांनी एकाच आक्रोश केला. घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यामध्ये गणेशला फिट आल्यामुळे तो हौदात बुडतांनाची दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.