Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»माझ्याकडे मराठा आरक्षणाचा फॉर्म्युला, प्रकाश आंबेडकरांचा जळगावात दावा
    महाराष्ट्र

    माझ्याकडे मराठा आरक्षणाचा फॉर्म्युला, प्रकाश आंबेडकरांचा जळगावात दावा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 19, 2023No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्याचा फॉर्म्युला माझ्याकडे आहे. मनोज जरांगे यांच्या मागणीवर माझ्याकडे उपाय आहे. पण आताच्या या चोरांपुढे तो मांडला तर ते त्याचे खोबरे करतील. त्यामुळे मी त्यांच्यापुढे हा उपाय मांडणार नाही. नवा सत्ताधारी येऊ द्या. त्यानंतर मी त्यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता कसा हाताळायचा हे सांगेन. असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जळगाव येथील आयोजित सभेत केले. यावेळी वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर, जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, शमिभा पाटील आणि पदाधिकारी उपस्थित होते.

    महाजनांवर निशाणा 

    यावेळी प्रकाश आंबेडकरांनी अनेकांवर टीका केली. मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधत आंबेडकर म्हणाले की, अॅडव्होकेट जनरल कुंभकोणी यांनी मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणाचा यशस्वीपणे हाताळला. पण त्यानंतरही तत्कालीन सरकारने कुंभकोणी यांना पुढे काम करू दिले नाही. त्यांना या खटल्यात लक्ष घालू नका, हजर राहू नका असे आदेश देण्यात आले. असे का? गिरीश महाजन यांनी या प्रश्नाचे उत्तर द्यावे.

     तमाशा सुरू

    विधिमंडळ अधिवेशनावर निशाणा साधताना हा लोकशाहीतील तमाशा असल्याचा आरोप केला. नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असल्याचे वाटत नाही. तिथे सत्ताधारी कोण अन् विरोधक कोण हेच समजत नाही. जे मुद्दे सत्ताधारी पक्षाने मांडले पाहिजेत, ते मुद्दे विरोधक मांडत आहेत आणि जे मुद्दे विरोधकांनी मांडले पाहिजेत ते मुद्दे सत्ताधारी मांडताना दिसून येत आहेत. असा लोकशाहीचा तमाशा तिथे सुरू आहे. राज्यापुढे अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. पण त्यावर कोणतीही चर्चा होत नाही. विशेषतः पीकविम्याच्या मुद्यावर अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

    काँग्रेसवर शरसंधान

    काँग्रेसने भाजपवर पक्ष फोडण्याचा आरोप केला. पण भाजपने नवे काहीच केले नाही. काँग्रेसनेही यापूर्वी अनेक पक्ष फोडले. त्यांनी आमच्यासोबत हेच केले होते. काँग्रेसने जे केले तेच भाजप करत आहे, असेही प्रकाश आंबेडकर यावेळी काँग्रेसवर शरसंधान साधताना म्हणाले.

    jalgaon Maratha Aarakshan prakash ambedkar
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण

    June 6, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif