Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»धक्कादायक: ८ महिन्याच्या गर्भवती पत्नीची हत्या
    गुन्हे वार्ता

    धक्कादायक: ८ महिन्याच्या गर्भवती पत्नीची हत्या

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 14, 2023No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

    भिवंडी तालुक्यातील अनगांव येथे पतीने ८ महिन्याची गरोदर असलेल्या पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी पतीने घराच्या मागील बाजूला असलेल्या जंगलात तिचा मृतदेह पुरला होता. आरोपी पतीचे नाव कल्पेश सुदाम ठाकरे (वय २६ रा. अनगांव) तर माई उर्फ मनिषा (वय २३) असे मयत पत्नीचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, १० मार्च २०१६ रोजी कल्पेश ठाकरे याचा प्रेमविवाह मनिषासोबत झाला होता. मनिषा ही व्यवसायाने बारबाला असल्याने तिला लग्नापूर्वीच दारू व सिगारेट पिण्याचे व्यसन होते. ती ज्या बारमध्ये बारबाला म्हणून काम करायची त्या बारमध्ये आरोपी कल्पेश हा मित्रांसोबत मद्यपान करण्यासाठी जात असे त्याच ठिकाणी त्यांची ओळख झाली व त्याचे प्रेमात रुपांतर झाले होते. या दोघांनी बांद्रा येथे विवाह कार्यालयात नोंदणी पद्धतीने लग्न केले. मात्र ऐषआरामाची सवय असलेल्या मनिषाचे सासरच्या मंडळींशी जमत नसल्याने हे दोघेही वर्षभरापासून अंबाडी येथे राहत होते.

    दरम्यान मनिषा आठ महिन्यांची गरोदर राहिल्याने कुटूंबात आनंद होता. मात्र मनिषाने दारू व सिगारेटच व्यसन सोडावे तसेच यामुळे आपल्या होणाऱ्या बाळावर या व्यसनाचा दुष्परिणाम होईल असे तिला आरोपी कल्पेश वांरवार सांगत होता. यावरून दोघामध्ये भांडणेही व्हायची. तरीही ती कल्पेशकडे दारू, सिगारेटची मागणी करायची.

    अखेर रोजच्या त्रासाला कंटाळून कल्पेश याने 9 मार्चच्या रात्री पत्नी माही हिचा गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर एक रात्र मृतदेह घरात ठेवून घराच्या मागील बाजूस असलेल्या जंगलात पुरला. त्यानंतर पोलिस व मनिषाच्या कुटुंबीयांची दिशाभूल करण्यासाठी कल्पेश याने शक्कल लावून पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार १२ मार्चला गणेशपुरी पोलिस ठाण्यात नोंदवली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने 8 महिन्याची गरोदर असलेल्या मनिषाचा शोध पोलिस घेत होते. आरोपी कल्पेश हा पोलिस ठाण्यात वारंवार जावून बेपत्ता पत्नीची चौकशी करीत असल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय आला. यावेळी पोलिसांनी मनिषाच्या आईवडिलांशी संपर्क केला असता तिचा मोबाईल ९ मार्चपासूनच बंद येत असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी कल्पेश याला ताब्यात घेवून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानेच पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह घराच्या मागील बाजूस असलेल्या जंगलात पुरल्याची कबुली दिली.

    दरम्यान मनीषाचे पुरलेले प्रेत बाहेर काढून मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पत्नीच्या हत्येप्रकरणी पती कल्पेशला याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    crime news Mumbai Murder News
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट

    October 12, 2026

    पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त

    October 12, 2026

    ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड

    October 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif