चाळीसगाव रेल्वे स्थानकावर वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्टॉलचा शुभारंभ

0

चाळीसगाव लोकशाही न्यूज नेटवर्क

वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्टॉल या संकल्पनेतून स्थानिक उत्पादनाला वाव मिळणार आहे.आज स्थानिक उत्पादन केळी वेफर्स आणि प्रॉडक्ट मुळे रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाची आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल सुरू आहे. असे प्रतिपादन जळगाव लोकसभा मतदारसंघाचे युवा खा. उन्मेश पाटील यांनी चाळीसगाव येथे केले. त्यांच्याहस्ते रेल्वे स्थानकावरील वन स्टेशन वन उत्पादन स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. उमंग महिला परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा सौ. संपदाताई पाटील यांच्याहस्ते स्टॉलचा शुभारंभ करण्यात आला.

त्यांच्या हस्ते स्टॉल धारक कैलास आहीरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जेष्ठ नगरसेवक राजूआण्णा चौधरी, माजी सभापती संजय पाटील, उप सभापती भाऊसाहेब पाटील, दिनेश बोरसे, पोलीस निरीक्षक शैलेंद्र सिंग, स्टेशन सल्लागार समिती जेष्ठ सदस्य विजय बाविस्कर, सामाजिक कार्यकर्ते पद्माकर पाटील, भाजप सरचिटणीस अमोल नानकर, शहर सचिव जितेंद्र वाघ, प्रवीण ठोके, राकेश कोतकर, नरेनकाका जैन, समकीत छाजेड, रवीआबा पाटील, प्राचार्य साळुंखे, उपप्राचार्य एस एस काटे, बंडू पगार, व्यापारी आघाडी जिल्हा सचिव अमित सुराणा, अजय वाणी, सुबोध वाघमारे,पराग कुलकर्णी, अमोल मराठे, योगाचार्य मधू कासार, अनिल चव्हाण , विकी चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.