अमरावतीच्या सहाय्यक आयुक्ताची पत्नीचा आणि पुतण्याचा गोळी झाडून खून; स्वतःवरही गोळी झाडून संपविले जीवन

0

पुणे:  पुण्यामध्ये सुट्टीसाठी आलेल्या अमरावतीच्या सहाय्यक पोलीस आयुक्ताने पत्नी आणि पुतण्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना येथे घडले असून हत्या केल्यानंतर सहाय्यक आयुक्तांनी देखील स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या घटनेत सहायक आयुक्त भारत गायकवाड यांची पत्नी मोनी गायकवाड (वय ४४) आणि पुतण्या दीपक गायकवाड (वय ३४) यांचा मृत्यू झाला आहे. सहायक आयुक्त गायकवाड अमरावतीतील राजपेठ विभागात सहायक पोलीस आयुक्त आहेत. शनिवारी सुट्टी असल्याने ते पुण्यात आले होते. पुण्यात बालेवाडी भागात गायकवाड, त्यांची पत्नी, दोन मुले आणि पुतण्या राहायला होते. रविवारी मध्यरात्री गायकवाड यांनी पत्नी मोनी आणि पुतण्या दीपक यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. त्यानंतर त्यांनी स्वत:वर पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली.

गायकवाड यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गायकवाड यांच्याकडे असलेले पिस्तूल जप्त केली आहे. गायकवाड यांनी खासगी वापरासाठी पिस्तूल घेतले होते. त्यांच्याकडे शस्त्र परवाना असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, गायकवाड यांनी पत्नी आणि पुतण्याचा खून का केला ?, याबाबतची माहिती मिळू शकली नाही. चतु:शृंगी पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.