Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»अवघ्या चार तासांत खुनाचा उलगडा ; दोन जणांना अटक
    उत्तर महाराष्ट्र

    अवघ्या चार तासांत खुनाचा उलगडा ; दोन जणांना अटक

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 31, 2024No Comments5 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सावदा ;- शिवारातील कोचूर रोडवरील एका शेतात काम करणाऱ्या सालदाराचा शेतातील खोलीत डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना शनिवार, ३० रोजी सकाळी उघडकीस आली होती. या घटनेत सुभाराम रिच्छू बारेला याचा खून करण्यात आला होता. सावदा पोलिसांनी अवघ्या चार तासात खुनाची उकली केली असून दोन आरोपींना अटक केली आहे. सुकलाल रतन लोहारे व अर्जुन मुन्ना आवासे अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

    जुन्या वादातून हा खून केल्याची कबुली आरोपीनी पोलिसांना दिली आहे.चार तासात गुन्ह्याची उकल सावद्याचे सहायक निरीक्षक जालिंदर पळे व पथकाने धाव तपासाची चक्रे वेगाने फिरवून आजुबाजुच्या परिसरातील सालगडी म्हणून काम करणाऱ्या सर्व मजुरांची माहिती घेतली.

    त्यावरुन दोन सालगडी त्याचे कामाच्या व राहण्याचे ठिकाणी नसल्याचे कळाले तर मालकाकडून शनिवारीच पैसे घेऊन ते गावी गेल्याचे कळल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. एका आरोपीचे नातेवाईक उदळी येथे असल्याचे कळाल्यानंतर गोपनीय माहितीवरून आरोपींना अटक करण्यात आली. यापूर्वी झालेल्या वादाच्या रागातून शनिवारी मध्यरात्री मयताच्या डोक्यात दगड टाकल्याची कबुली आरोपींनी दिली. अवघ्या चार तासात गुन्ह्याची उकल करण्यात सावदा पोलिसांना यश आले.

    यांनी उघडकीस आणला गुन्हा जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जालिंदर पळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे, एएसआय संजय देवरे, हवालदार विनोद पाटील, हवालदार यशवंत टहाकळे, हवालदार देवेंद्र पाटील, हवालदार विनोद तडवी, प्रकाश जोशी, किरण पाटील आर्दीच्या पथकाने गुन्हा उघडकीस आणला

     

     

    #crime #murder Savda
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    यावलच्या सोनाली तायडे यांचा बेस्ट बिझनेस अँड ब्युटी आर्टिस्ट अवॉर्डने सन्मान

    September 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif