मलकापुरात मुद्देमालासह साडेचार लाखांचा गुटखा जप्त

0

मलकापूर :- मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने रात्रीच्या सुमारास नाकाबंदी व कोंबिंग ऑपरेशन सुरू असताना तीन लाख रुपयांच्या मुद्देमालासह अंदाजे साडेचार लाख रुपयांचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा पकडला आहे. यात एका आरोपीला ताब्यात घेतले असून यातील दोन आरोपी फरार आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने धरणगाव ते मलकापूर तहसील चौकात नाकाबंदी तसेच कॉम्बिग ऑपरेशन राबवत असताना मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पो.नि. अनिल गोपाळ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने सापडा रचून MH 43 AF 6562 हे वाहन पकडण्यात आले या वाहनाची झडती घेतली असता यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विमल व सुगंधित गुटखा आढळून आला .

याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी आरोपी चालक शेख यासीन शेख रहमान 44 रा.मोमीनपुरा पारपेठ मलकापूर याला ताब्यात घेतले असून दोन आरोपी साजिद खान चांद खान ( कॅप्टन ) इरफान खान रहमान खान उर्फ बाबू खान रा. पारपेठ मलकापूर हे फरार आहे, याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी या तीनही आरोपींविरुद्ध विविध कामांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. सदर कारवाई ही बुलढाणा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या आदेशावरून अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.