एरंडोल:- स्विप कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत येथे रविवारी ३१ मार्च २०२४रोजी सकाळी शानदार सायकल रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याचे पूजन करून माल्यार्पण केले व शहरातून रॅली व्दारे मतदारांशी संवाद साधत सर्वांनी निर्भयपणे व निःपक्षपातीपणें मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. एरंडोल वासियांनी या उपक्रमास स्वयंस्फूर्त प्रतिसाद दिला.
या सायकल रॅली ची सुरुवात तहसिल कार्यालयापासून होऊन शहरातील विविध मार्गांनी रॅली नेण्यात येऊन तहसिल कार्यालयात रॅली ची सांगता झाली. कासोदा येथील मधुकर ठाकूर यांनी विशिष्ट रीतीने सायकल ची सजावट करून मतदारांची जनजागृती केली.
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मनिषकुमार गायकवाड, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी सुचिता चव्हाण, तहसिल कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी, शासकीय कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी, बी.एल.ओ व नागरीक सायकल रॅलीत सहभागी झाले.