धक्कादायक; पुण्यात युवकाची तलवार भोसकून हत्या

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

नांदेड शहरात पैशाच्या देवाण-घेवाणीवरून एका युवकाचा तलवारीने घाव घालून खून करण्यात आला आहे. नांदेड शहरातील सराफ भागात रात्री ही घटना घडली. हा सर्व पारकर सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. केशव पवार आणि सागर यादव दोघांमध्ये अनेक दिवसापासून जुना वाद सुरु होता. त्यातच पैशाच्या वादावरून सोमवारी रात्री या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारी पर्यंत गेले.

सीसीटीव्ही कॅमेरात काही युवक हातात तलवारी घेऊन मारहाण करतांना दिसत आहे. या हाणामारीत सांगत यादव याच्या डोक्यात तलवारीचे घाव मारल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेत मयत सागर याचा भाऊ जखमी झाला आहे. या घटनेने मात्र नांदेड शहरातील सराफ भागात मोठी दहशत निर्माण झाली आहे. नागरिक भयभीत झाले आहे.

खुनाच्या घटनेने मावळ पुन्हा हादरले
पुणे मुंबई जुन्या महामार्गालगत अंधारात थांबलेल्या तरुणाला तू इथे का थांबलास असं म्हणत चार जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करत तरुणाच्या छातीत चाकू भोसकून हत्या केल्याची घटना उजेडात आली आहे. कृष्णा शेळके असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव पोलिस अधिक तपास करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.